कालठण नं .१ ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रम.
वर्षाचा ग्रामपंचायत कर पूर्ण भरलेला आहे .त्यांना दररोज अॅरोचे २० लिटर थंडपाणी मोफत

कालठण नं .१ ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रम.
वर्षाचा ग्रामपंचायत कर पूर्ण भरलेला आहे .त्यांना दररोज अॅरोचे २० लिटर थंडपाणी मोफत
इंदापूर प्रतिनिधी ; बारामती वार्तापत्र
ग्रामपंचायत कालठण नं.१ च्या वतीने गावातील ग्रामस्थांसाठी नवीन सिंगल फेज आर ओ प्लांट ( फिल्टर ) कुलिंग मशीन( चिलरसहित ) २४ तास सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक भरत जावळे यांच्या हस्ते फीत कापून व माजी सरपंच विठ्ठल सपकळ ( कारभारी ) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये विविध विकासकामे केली जात असून ज्या नागरीकांनी चालू वर्षाचा ग्रामपंचायत कर पूर्ण भरलेला आहे .त्यांना दररोज अॅरोचे २० लिटर थंडपाणी मोफत देण्याचा स्तुत्य निर्णय घेतलाआहे. या आगोदर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कुठूंबाला मोफत दळण दळून देण्याचा उपक्रम राबविलेला आहे .तसेच फिल्टर पाणी २५ पैसे लिटरप्रमाणे दिले जात होते .त्याच पद्धतीने बिगर घरपट्टी पाणी पट्टी भरणाऱ्या नागराकांना पूर्वीच्याच २५ पैसे प्रतिलिटर या दरात थंड पाणी २४ तास उपलब्द होणार आहे तरी सर्व नागरीकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरून याचा लाभ घ्यावा असे अवाहन सरपंच सौ . सोनाली संदीप जाधव यांनी सर्व ग्रामस्थांना केले आहे .
यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय जगताप ग्रामपंचायत सदस्य मधुकर क्षिरसागर, दिनकर जगताप डॉ. लक्ष्मण सपकळ , संतोष पाडुळे,तुकाराम पांडूळे गणेश पाडूळे दादासाहेब गलांडे गोरख पाडूळे भारत शिंदे अब्दुल शेख किंचक जगताप , किसन सपकळ,रणजित सपकळ आबासो पाटील , समाधान पाटील ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.