काल दि. २३, माळेगांवातील दांपत्याचा रोटी घाटात अपघात,दोन जखमी तर महिलेचा मृत्यू.
या अपघातात मोनाली या थेट ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काल दि. २३, माळेगांवातील दांपत्याचा रोटी घाटात अपघात,दोन जखमी तर महिलेचा मृत्यू.
या अपघातात मोनाली या थेट ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दौंड :बारामती वार्तापत्र
पाटस ते बारामती राज्यमार्गावरील रोटी घाटाच्या नागमोडी वळणावर ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या महिलेचा पती व मुलगा जखमी झाला आहे.
मोनाली सूरज जाधव (वय २५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर सूरज प्रकाश जाधव (वय २७) व प्रतीक सूरज जाधव (वय ५, सर्व रा. माळेगाव, ता. बारामती) हे दोघे जखमी झाले आहेत.
पाटस पोलिस चौकीचे हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी ही माहिती दिली. बुधवारी (ता. २३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरून पाटस वरून बारामतीला जात असताना रोटी घाटाच्या पहिल्या वळणावर ट्रकच्या पुढे जात असताना त्यावेळी ट्रकचा स्कूटीला धक्का लागल्याने स्कुटी बाजूला पडली.
या अपघातात मोनाली या थेट ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सूरज व प्रतीक हे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, सहायक फौजदार सागर चव्हाण, हवालदार बाळासाहेब पानसरे, पोलिस नाईक सुधीर काळे, समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी परिसरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती पोलीसांनी दिली.