श्रीमंत मल्हाराव होळकर यांची ३२९ वी जयंती फलटण तालुक्यातील होळ- मुरूम या जन्मगावी उत्साहात साजरी..

मल्हारराव होळकर करांच्या होळ गावी मल्हारसृष्टी करण्याचा मानस - संजीवबाबा निंबाळकर

श्रीमंत मल्हाराव होळकर यांची ३२९ वी जयंती फलटण तालुक्यातील होळ- मुरूम या जन्मगावी उत्साहात साजरी..

मल्हारराव होळकर करांच्या होळ- मुरूम गावी मल्हारसृष्टी करण्याचा मानस – संजीवबाबा निंबाळकर

बारामती वार्तापत्र

मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांची ३२९ वी जयंती त्यांच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या होळ- मुरूम गावी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पहिल्यांदाच मल्हाराव होळकर यांची पालखीसोहळा गावांमध्ये काढण्यात आली. त्यांच्या होळ- मुरूम या मूळ जन्मगावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देखील उपलब्ध झालेला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून जवळपास एक कोटी 63 लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध झालेला असून सभामंडप, भक्त निवास घाट, रस्ते, स्ट्रीट लाईट, भूमिगत गटारी अशी कामे मार्गी लागणार आहेत. या विकासकामाचे भूमिपूजन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सातारा जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष संजीवबाबा निंबाळकर, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजेहोळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांताचे सदस्य हेमंतराव हरहरे, पुणे जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष संपतराव देवकाते, सातारा जि प. माझी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सभापती शंकरराव माडकर, ॲड.गोविंद देवकाते, ॲड.जीबी अण्णा गावडे, ॲड.रमेश कोकरे, सुनील भगत, पांडुरंग कचरे, बापूराव सोनवलकर, योगेश संकपाळ सरपंच, आदी ग्रामस्थ समाजबांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या जयंती उत्सवाचे सूत्रसंचालन कुलकर्णी मॅडम तर आभार ॲड.गोविंद देवकाते यांनी मानले.

कोट- श्रीमंत मल्हारराव होळ- मुरूम कर हे अटकेपार झेंडा रोवण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही. यामुळेच मल्हाराव होळ- मुरूम कर यांच्या जन्मगाव असलेल्या होळ- मुरूम गावी लवकरच ऐतिहासिक “मल्हार सृष्टी” निर्माण करण्याचा आमचा सर्वांचा मानस असल्याचे सातारा जिल्ह्याचे माजी परिषद अध्यक्ष संजीवबाबा निंबाळकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!