काळजी घ्या ! बारामतीत कोरोनाची वाटचाल ‘चाळीशी’ कडे,, रुग्ण संख्या वाढतेय
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 6474 वर गेली आहे.
काळजी घ्या ! बारामतीत कोरोनाची वाटचाल ‘चाळीशी’ कडे,, रुग्ण संख्या वाढतेय
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 6474 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
थांबलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय रुग्णांची वाढती संख्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी आहे मात्र मागील दोन महिन्यातील संख्या व आत्ताच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे मात्र शहरातील संख्या वाढलेलीचबारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या 37 झाली आहे.शासकीय rt-pcr 140 नमुन्यामधून 17 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 28 rt-pcr रुग्णांपैकी 11रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 22 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 9 रुग्ण आहे.
शहरातील 26 तर ग्रामीण भागातील 11 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
काल बारामती मध्ये तपासलेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कसबा येथील बत्तीस वर्षे पुरुष, मेखळी येथील २३ वर्षे पुरुष, जळोची येथील २८ वर्षे पुरुष, काटेवाडी येथील ४ वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील २१ वर्षीय महिला, आमराई येथील पिडीसीसी बँक शेजारील २५ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, तांदुळवाडी साईनगर येथील ७० वर्षीय महिला, खांडज येथील ५२ वर्षीय महिला, मोढवे येथील ३१ वर्षीय पुरुष, कचरी रोड येथील ४० वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटी शेजारील ७३ वर्षीय महिला, रुई येथील तीस वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील ३५ वर्षीय महिला, जयश्री गार्डन येथील ४० वर्षीय महिला, खांडज येथील ३२ वर्षीय पुरुष व ५८ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये हनुमानवाडी पणदरे येथील ३६ वर्षीय महिला, भिकोबानगर येथील ४७ वर्षीय महिला, चंदन मेडिकल समोर ७३ वर्षीय महिला, ७३ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज रोड अपार्टमेंट येथील ५४ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, सितारामनगर रुई येथील सुयश बांगला येथील ४५ वर्षे पुरुष, मांडण हॉस्पिटल शेजारील २७ वर्षे पुरुष, मारवाड पेठ येथील प्रकाश कलेक्शन शेजारील ४३ वर्षीय पुरुष, उत्कर्ष सिटी येथील ३५ वर्षीय पुरुष व बाबुर्डी येथील लवटे वस्ती येथील ३० वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6474 आहे तर बरे झालेले रुग्ण 6212व एकूण मृत्यु 145 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा