कासव तस्करी प्रकरणी बारामतीत दोन संशयित ताब्यात
सदर कासवा बाबत चौकशी केली असता ते विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
कासव तस्करी प्रकरणी बारामतीत दोन संशयित ताब्यात
सदर कासवा बाबत चौकशी केली असता ते विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
बारामती वार्तापत्र
कासवाची तस्करी करून ती विक्रीसाठी जवळ बाळगणार्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राजू सजन गायकवाड (वय 22, रा. आमराई बारामती ),विजय अरुण गायकवाड (वय 21 रा.आमराई बारामती) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि 22 रोजी पहाटे तीनच्या सुमारास बारामती तालुक्यातील वंजरवाडी येथे दोन अनोळखी इसम रिक्षांमधून संशयित रित्या फिरत असल्याची माहिती ग्राम संरक्षण यंत्रणा कडून प्राप्त झाली होती.
सदरची माहिती प्राप्त होताच तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन वरील संशयित दोघांना ताब्यात घेतले व अधिकची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडील ऑटो रिक्षा क्रमांक (एम.एच.बी.२०५४) मध्ये एक कासव मिळून आले. सदर कासवा बाबत चौकशी केली असता ते विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. कासवा पासून पैशांचा पाऊस पडतो. या अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते.
सदर दोन्ही संशयित आरोपी व त्यांच्या ताब्यातील कासव व ऑटोरिक्षा पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रमोद पोरे, हवलदार दत्तात्रय कुंभार,रमेश नागटिळक,पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, प्रशांत राऊत, मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, निखिल जाधव, अबरार शेख यांनी केली