कित्येक दिवसांपासून समर्थ नगर व गुणवडी भागातील बत्ती गुल; गाव दादांचे अद्यापपर्यंत दुर्लक्ष
नागरिकांच्या तक्रारींकडे नगरपरिषदेचा कानाडोळा
कित्येक दिवसांपासून समर्थ नगर व गुणवडी रोड भागातील बत्ती गुल; गाव दादांचे अद्यापपर्यंत दुर्लक्ष
नागरिकांच्या तक्रारींकडे नगरपरिषदेचा कानाडोळा
बारामती वार्तापत्र
गेल्या काही दिवसांपासून बारामतीतील गुणवडी रोड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.मात्र काम सुरू असल्या पासून त्या रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट्स देखील बंद आहेत.त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात आलेले खड्डे देखील दिसण्यास अडथळा निर्माण होत असून तिथे रोज एक तरी अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे सांयकाळी ६ नंतर त्या रस्त्यावर जाणे म्हणजे एक प्रकारे मृत्यूला आमंत्रण असल्या सारखेच आहे.
तेथूनच काही अंतरावर राहत असणाऱ्या समर्थ नगर भागातील नागरिकांना गेल्या एक महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्याने तेथील नागरिकांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असून तेथील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.त्यामुळे तेथील महिला वर्गांला याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.शिवाय त्या ठिकाणी एक आजी तर दोन माजी नगरसेवक असून त्यांनी देखील या रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट चालू करण्यासंबंधी वेळोवेळी नगर पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.परंतु त्यांच्याच तक्रारीकडे जर नगरपरिषद दुर्लक्ष करत असेल तर आपल्या सारख्या सर्वसामान्यांच काय ? असा प्रश्न तेथील नागरिकांना भेडसावत आहे.
त्यामुळे आता नेहमी पहाटे ६ वाजल्या पासून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणाऱ्या अजितदादांनी एकदा सांयकाळी ६ नंतर येथे येऊन आमची काय अवस्था होते याची देखील पाहणी करावी असा तेथील नागरिकांचा सूर आहे.