किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला, मुलाचा फैसला उद्यावर
नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला, मुलाचा फैसला उद्यावर
नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
मुंबई – प्रतिनिधी
किरीट सोमय्या यांना कोर्टाने धक्का दिला आहे. सोमय्यांना अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आहे. INS विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात किरीट सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावेळी कोर्टाने काही महत्तपूर्ण निरीक्षणे नोंदवली. सोमय्यांनी जरी हा मदतनिधी पक्षासाठी गोळा केलेला असला तरी ती रक्कम नेमकी किती आहे आणि मदतनिधीची रक्कम कुणाकडे दिली गेली? याची माहिती सोमय्यांनी द्यावी, असं कोर्टाने म्हटलेलं आहे.
आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. पण मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होतं. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत.