कुत्र्याची पिल्ले चोरी गेल्याची घटना.
काटेवाडी मधील घटना.
बारामती:वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस ठाणे येथे शुभम कुंभार राहणार काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी त्यांची दोन जर्मन शेफर्ड जातीची कुत्र्याची पिल्ले 20000/- रुपये किमतीची चोरीस गेलेल्या बाबत तक्रार दिली होती सदर गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शन खाली तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि योगेश लंगोटे सहाय्यक फौजदार सोनवणे पोलीस हवलदार बंडगर पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी नामे शुभम भीमराव धोत्रे व अमर बाबुराव सोनवणे राहणार सणसर तालुका इंदापूर यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांचेकडून चोरीस गेलेली दोन्ही कुत्र्याची पिल्ले हस्तगत केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भानुदास बंडगर हे करीत आहेत