कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या इंदापूर शहर अध्यक्ष पदी पोपट शिंदे यांची निवड.
कुस्ती क्षेत्रातील आवड व काम पाहता करण्यात आली निवड.
कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या इंदापूर शहर अध्यक्ष पदी पोपट शिंदे यांची निवड.
कुस्ती क्षेत्रातील आवड व काम पाहता करण्यात आली निवड.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा विरोधी पक्षाचे नेते पोपट शिंदे यांची दि.21 ऑगस्ट रोजी जागतिक कुस्ती मल्लविद्या महासंघ व भारतीय कुस्ती मल्लविद्या महासंघ यांच्या संलग्न असणाऱ्या कुस्ती मलविद्या महासंघ महाराष्ट्र राज्यच्या इंदापूर शहर अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
पोपट शिंदे यांचा इंदापूर शहर व तालुक्यातील या क्षेत्रातील जनसंपर्क पाहता शहरासह तालुक्यात कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थेची कार्यवाढ होण्याकरिता मदत होणार आहे.
शिंदे यांची निवड पुढील 3 वर्षासाठी करण्यात आली असून वेळोवेळी संस्थेच्या विविध उपक्रम यासह वेळोवेळी संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात सक्रिय राहिले पाहिजे असे संस्थेकडून लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.
या निवडीबद्धल पोपट शिंदे यांना पुढील कार्यासाठी इंदापूर शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांमधून शुभेच्छा देण्यात येत आहेत.