कु. नेहा राजकुमार दोशी ची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गोगो मॅगझीन ने घेतली दखल.
सर्व प्रथम डिजिटल कलेचा नवीन ट्रेंड बाजारात आणण्याचा मान.
कु. नेहा राजकुमार दोशी ची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गोगो मॅगझीन ने घेतली दखल.
सर्व प्रथम डिजिटल कलेचा नवीन ट्रेंड बाजारात आणण्याचा मान.
बारामती:वार्तापत्र
आपण सर्वजण लोकडाऊन मध्ये अडकलो आहोत आणि अशा परिस्थितीत आपण स्वतःला सकारात्मक आणि क्रियाशील ठेवले पाहिजे.
या लोकडाऊनचा काळात नवीन गोष्टी आत्मसात करण्याची संधी होती. या संधीचा फायदा घेत बारामती च्या कु. नेहा राजकुमार दोशी हिने एक नवीन कला आत्मसात केली.
ती म्हणजे `डिजिटल आर्ट ‘.व या द्वारे तिने जगात नाव कमावले आहे .
डिजिटल आर्ट म्हणजेच वेक्टर आर्ट. सोशल मीडिया आणि यंगस्टर्स हा नवीन आर्ट ट्रेंडिंग आहे.
लोकडाऊन चा काळात आपण डिजिटल रूपातच एकमेकांशी संबंध साधत होतो तर मग डिजिटल आर्ट का नाही ?
नेहा ही प्रोफेशनली आर्किटेक्ट असल्यामुळे तिला नवीन गोष्टी बघणे, करणे आणि शिकणे नेहमीच प्रिय आहे.
या कलेने ती सतत स्वतःला कार्यमग्न ठेवत असे व कलेचा आनंद घेत असे.कलाकाराला कला हि नेहमीच प्रिय असते. कला हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.
या कलेच्या माध्यमातून तिने तयार केलेले सर्व चित्र सोशल मीडियावर टाकल्यावर तिचे दखल आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ गोगो मॅगझीन’ यांनी घेऊन तिच्या चित्रास प्रसिद्धी दिली.
मानवी जीवन,सुख,दुःख,हावभाव,हास्य,राग,आनंद,आदी चेहऱ्यावर दाखवता येते. आपला फोटो तोच फक्त त्यास विविध प्रकारे पेंटिंग करून तयार करता येते.
बाल अवस्था, तरुण अवस्था ,वृद्ध अवस्था,आशा तिन्ही अवस्था दाखवताना गरिबी व श्रीमंती हे या कलेद्वारे दाखवले व सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली आणि त्याची दखल
गोगो मॅगझीन ने घेतली असल्याचे नेहा दोशी यांनी सांगितले.
गोगो मॅगझीन ची लिंक खालील प्रमाणे –
https://gogomagazine.in/illustrations_by_neha/
इंस्टाग्राम ची लिंक खालील प्रमाणे-
https://instagram.com/illustrations_by_neha?igshid=pjycsid5qxur
28 मार्च ला सर्वप्रथम विविध देशातून मागणी वाढली व त्यानंतर राज्यात व आता बारामती मध्ये प्रचार व प्रसार झाला आहे.
लॉकडाऊन च्या काळात कला जोपासली व त्यास तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.