आपला जिल्हा
कृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का?; अजित पवार म्हणाले…
'केंद्र सरकारची कृषी सुधारणा विधेयके शेतकऱ्यांना फायद्याची वाटत नाहीत. विविध शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकांना विरोध केला आहे
कृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का?; अजित पवार म्हणाले…
पुणे: बारामती वार्तापत्र
‘केंद्र सरकारची कृषी सुधारणा विधेयके शेतकऱ्यांना फायद्याची वाटत नाहीत. विविध शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकांना विरोध केला आहे. तरीही ही विधेयके लागू करण्यासाठी एवढी घाई करण्याचे कारण काय,’ असा सवाल करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कृषी सुधारणा व कामगार विधेयकांची अंमलबजावणी राज्यात होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील,’ अशी भूमिका मांडली. या विधेयकांमुळे कोणते नवीन प्रश्न निर्माण होतील; तसेच न्यायालयात गेल्यानंतर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.