कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
बारामती वार्तापत्र
ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती च्या प्रक्षेत्रावर , आज दिनांक 9 फेब्रुवारी 2022 बुधवार ते रविवार दिनांक 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत आयोजित कृषिक कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ, बारामतीच्या नगराध्यक्षा मा. सौ.पौर्णिमाताई तावरे, जिल्हा परिषद सदस्य सौ.रोहिणीताई तावरे, पंचायत समिती बारामतीच्या सभापती सौ.नीताताई फरांदे, NIASM माळेगाव चे संचालक डॉ.हिमांशू पाठक, अटारी पुणे चे डायरेक्टर डॉ.लाखन सिंह, डॉ.पी.यन.रसाळ अधिष्ठाता महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि शेतकरी कुटुंब आणि ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व विश्वस्त ,यांचे उपस्थितीत सकाळी 9:00 वाजता नारळ फोडून झाला.
उपस्थित मान्यवरांनी केवीके प्रक्षेत्रावरील विविध पिकांच्या प्रात्यक्षिकाची माहिती घेतली, कंपन्या व शासकीय संस्था यांचे दालन, इनोवेशन स्टार्टर्स दालनाला भेट दिली तेथील तरुण उद्योजकांना बरोबर चर्चा केली तसेच भीमथडी जत्रा पशुपक्षी दलनला ही भेट दिली.
या भव्य कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये एकशे दहा एकर क्षेत्रावर भाजीपाला व फुलांचे नाविन्यपूर्ण जातींची लागवड, संरक्षित शेतीचे विविध प्रयोग, खते देण्याच्या विविध पद्धती, एकात्मिक शेती प्रकल्प, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, मोत्याची शेती, प्रक्रिया युक्त पदार्थ निर्मिती, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स, Innovations, विविध जातिवंत जनावरे आणि पशुपक्ष्यांचे दालन, भरड धान्याच्या विविध जाती आणि त्याचे प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात मार्गदर्शन, औषधी वनस्पती लागवड, भाजीपाला कलमी रोपे, जातिवंत कलमी रोपांची फळरोपवाटीका, देश-विदेशातील न्यानो तंत्रज्ञान, देशी-विदेशी भाजीपाला, अत्याधुनिक मशनरी , ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान, सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर, टिशू कल्चर रोपे निर्मिती इत्यादी तंत्रज्ञान पाहून एकच ठिकाणी शेती व निगडित व्यवसाय पाहण्याची नामी संधी पुढील चार दिवस रविवार पर्यंत मिळणार आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या सप्ताहादरम्यान संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे , कृषी मंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार हे या दरम्यान भेटी देणार आहेत . तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
– स्थळ- ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र शारदा नगर बारामती. वेळ -सकाळी 9:00ते सायंकाळी 5:00 पर्यंत
कृषीक ऍप वरून नाव नोंदणी केल्यास प्रवेश फी मध्ये सवलत आधार कार्ड आवश्यक