कृषी विज्ञान केंद्राच्या पोषण थाळी स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :- सुनंदा पवार
सुनंदा पवार बोलताना म्हणाल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती च्या पोषण थाळी स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या पोषण थाळी स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :- सुनंदा पवार
सुनंदा पवार बोलताना म्हणाल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती च्या पोषण थाळी स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
बारामती वार्तापत्र
ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती, शारदा महिला संघ, पंचायत समिती बारामती आणि, शारदा कृषी वाहिनी ९०.८ आयोजित आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा (दि:२१) रोजी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी या स्पर्धेमध्ये मळदच्या एकता महिला शेतकरी गटाने पटकविला पोषण थाळी स्पर्धेतील प्रथम पुरस्कार तसेच द्वितीय पुरस्कार सौ. लतिका गाढवे शारदानगर यांना देण्यात आला. तृतीय पुरस्कार संकल्प बचत गट बनकर मॅडम यांना देण्यात आला. त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली त्यामध्ये वर्षा गायकवाड पंदरे, एम.डी. पवार पंदरे, आणि निलम मुळीक अंबिकानगर बारामती यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
एकता गटातील महिलांनी आपल्या शेतातील भाज्यापासून बावावलेली शेवगा पणाची भाजी, मोड आलेले कडधान्य उसळ, आळूची वडी, जवस करले चटणी, कोशिंबीर, लिंबू अंबा लोणचे, खपली गव्हाची लापशी व सलेड ई ताट ठेवलं होते. त्यामध्ये कल्पना प्रशांत शेंडे, स्वप्नाली सूरज होले, प्रीतम गावडे यांनी स्व्यपाक केला.
या स्पर्धेला ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचया विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नवले, व ट्रस्टचया एच आर, गार्गी दत्ता यांनी भेट दिली व महिलांना मार्गदर्आशन केले.
सुनंदा पवार बोलताना म्हणाल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती च्या पोषण थाळी स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. यावर्षी ३५ महिला गट व महिलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. स्पर्धेमध्ये ठेवलेले पदार्थ खूप उत्कृष्ट आहेत. खूप सुंदर आहे असे त्या बोलल्या पुढं त्याम्हणाल्या आपणाला कोरोणा रोगाने खूप शिकवले आहे. सदृढ आरोग्य, व्यायाम व स्वच्छता हेच याचेमुळ आहे. आहारामध्ये चीघळ, माट, घोळ यासारख्या भाज्यांचा वापर केल्यास आपल्याला पैसे लागत नाहीत. त्याचा आपण आहारात वापर करावा . मेथी पालक चाकवत इत्यादी हिरव्या भाज्या बाजारात दिसतात. परंतु त्यावर ती औषधे खते याचा वापर किती आहे हेही पाहणे गरजेचे आहे. तसेच सकस अन्न हेच तुमच औषध आहे. पालक, गाजर, बीट कोथिंबीर जिरे धने हे आरोग्य साठी पोषक आहेत. ब्रेड, बर्गर त्याने आजार वाढतात आपला आहार व्यवस्थित असल्यास थकवा येत नाही कॅन्सरसारखे आजार सांगायला महिला लाजतात व खूप असह्य झाल्यावर ते सांगतात आपण वर्षातून एकदा रक्त तपासणी करून घ्यावी, साठ वर्षानंतर आयुष्य बोनस आहे. हसत खेळत आयुष्य जगावे. कोरोना, डेंगू, गोचीड ताप येतच राहतील आपल्या घराशेजारी सेंद्रिय परसबाग करा व रानभाज्या त्यात करा असे त्या म्हणाल्या.
दिवसेंदिवस लोकांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे त्यासाठी लोकांनी व्यायाम करायला हवा म्हणजे आपली प्रकृती ठीक राहील याच्यासह जोडीला सकस आहार घेतल्यास आपणच आपले डॉक्टर आहोत असे डॉ. अनिल बागल म्हणाले..
गिरिजा हॉस्पिटलच्या डॉ. अमृता वाकचौरे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार गरजेचा आहे. आपण दररोज विटामिन शरीरामध्ये घेतली पाहिजेत त्यासाठी पालेभाज्या दूध फळे खाणे गरजेचे आहे. डायबिटीस व गर्भवती मातांसाठी, मुलांसाठी आहरा बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी जंक फूड खाऊ नये असे सांगितले तसेच घरगुती अन्न आपणास निरोगी ठेवते व बाहेरील अन्न आपणास दवाखान्यात नेते असे त्या म्हणाल्या. डॉ. रतन जाधव यांनी अंडी दूध व मांस यांचा आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन केले, संतोष गोडसे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन खलाटे यांनी आभार मानले.