केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे रूग्णालयात दाखल
अॅजिओप्लासीट शस्त्रक्रिये दरम्यान काही ब्लॉकेजेस होते ते काढण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे रूग्णालयात दाखल
अॅजिओप्लासीट शस्त्रक्रिये दरम्यान काही ब्लॉकेजेस होते ते काढण्यात आले आहेत.
मुंबई, प्रतिनिधी
भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयाचा त्रास उद्भवू लागल्याने रूग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांना दाखल केल्याची माहिती मिळतेय.
70 वर्षीय नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांची एन्जिओग्राफी केली. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करुन, एक स्टेन टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आजच त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना आज आणि उद्या रुग्णालयात ठेवलं जाईल अशी शक्यता आहे. नारायण राणे त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही त्रास नाही.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातही नारायण राणे रुग्णालयात दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गेल्यावर्षी सुद्धा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. रुटीन चेकअपसाठी राणे रुग्णालयात गेले होते. त्याच काळात नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्र सुरू होती. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात वादळ उठलं होतं. याच दरम्यान राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. त्यानंतर पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू होण्यापूर्वी नारायण राणे हे लीलावती रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी पोहोचले होते.