केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा,चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य

एअर बॅग्सची किंमत १८०० रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा,चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य

एअर बॅग्सची किंमत १८०० रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येईल.

प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये गडकरी म्हणाले की, ‘आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये   किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे.  केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.’

चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे   महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईलस असेही गडकरी यांनी सांगितले.

किंमत 3000 ते 4000 रुपयांपर्यंत वाढेल
एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारमधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे.   एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअर बॅग्स लावल्या तर किंमत फक्त ८ ते ९ हजारांनी वाढेल. एअर बॅग्सची किंमत १८०० रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दरही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्स दिल्यास गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram