केडगाव च्या युवकाने दहा दिवसांच्या चिमुकल्या साठी केले रक्तदान.
मी कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. याचा मला अभिमान आहे. : धनराज मासाळ
केडगाव च्या युवकाने दहा दिवसांच्या चिमुकल्या साठी केले रक्तदान.
मी कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. याचा मला अभिमान आहे. : धनराज मासाळ
यवत: बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील केडगाव येथील युवक धनराज मासाळ अनेक सामाजिक कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात. व सोशल मीडियावरून या महामारीच्या काळातही त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केले आहे. दहा दिवसांच्या चिमुकल्या साठी ए पॉझिटिव्ह रक्तगट आवश्यक आहे हे त्यांना सोशल मीडिया ग्रुपवरून समजताच त्यांनी दुचाकीवरून ५० किलोमीटर प्रवास करून हडपसर येथे दहा दिवसांच्या चिमुकल्याला रक्त देऊन चिमुकल्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सविस्तर हकीकत अशी की, हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये फुरसुंगी येथील निलेश जगताप यांचा १० दिवसाचा चिमुकला रक्तातील जिवाणू संसर्गामुळे आजारी आहे. त्याला पेशींची कमतरता भासत असुन रक्ताची नितांत गरज आहे. या संदर्भात दौंड तालुक्यातील कोविड हेल्पसेंटर या सोशल मीडिया ग्रुपवर या चिमुकल्याला ए – पॉझिटिव्ह हा रक्तगट आवश्यक असल्याचा संदेश व्हायरल झाला. धनराज मासाळ यांचा रक्तगट ए – पॉझिटिव्ह आहे. खातरजमा केल्यानंतर दि ६ नोव्हेंबर रोजी मासाळ हे स्वतःच्या दुचाकी वरून जाऊन त्यांनी हडपसर येथे पुणे ब्लड बँक येथे जाऊन रक्तदान केले. याबाबत निलेश जगताप कुटुंबियांनी मासाळ यांचे आभार व्यक्त केले. संबंधित चिमुकल्याला आगामी दहा दिवस ए – पॉझिटिव्ह रक्त लागत असून दौंड तालुक्यातील युवकांना या संदर्भात आवाहन केले जाईल अशी माहिती सामाजिक कार्येकर्ते मयुर सोळसकर यांनी दिली. तसेच मी कोणाचा तरी जीव वाचवू शकतो, याचा मला अभिमान आहे. व भविष्यात ही माझ्या हातून असे सत्कार्य घडावे अशी भावना मासाळ यांनी व्यक्त केली.