कॉलेज ऑफ फार्मसी, माळेगाव मध्ये ऋतुरंग साजरा
"स्पोर्ट गाला" या क्रिडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सी खेच, खो खो, चेस , ई. क्रीडा प्रकारात सहभाग घेतला.

कॉलेज ऑफ फार्मसी, माळेगाव मध्ये ऋतुरंग साजरा
“स्पोर्ट गाला” या क्रिडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सी खेच, खो खो, चेस , ई. क्रीडा प्रकारात सहभाग घेतला.
बारामती वार्तापत्र
दिनांक १८ मे, २०२२ माळेगाव (बू), येथील श्रीनगर विद्या प्रसारक मंडळ च्या कॉलेज ऑफ फार्मसी च्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम “ऋतुरंग २०२२” संस्थेचे विश्वस्त मा. रवींद्र थोरात, सचिव मा. प्रमोद शिंदे, प्राचार्य. डॉ. आर. बी. जाधव, डॉ. मुकणे, प्रा. वाबळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विद्यार्थ्यानी सुरुवातीला “स्पोर्ट गाला” या क्रिडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सी खेच, खो खो, चेस , ई. क्रीडा प्रकारात सहभाग घेतला.
क्रीडा मोहत्सवचे आयोजन डॉ. तेजस्विनी देशमुख आणि प्रा. हृषिकेश जोशी यांनी केले.
दिनांक १७ व १८ मे, २०२२ या दोन दिवसात विद्यार्थ्यानी डान्स, ड्रामा, फॅशन शो, ट्रॅडिशनल शो, व्हिडिओ मेकिंग इत्यादींच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक भान जपत संकल्पनात्मक मांडणी करत मोबाईल चा अतिरेक, प्रदूषण, पर्यावरण या सारख्या समस्यांचा उहापोह केला.
क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या विजेते आणि उपविजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
कोरोना दरम्यान बंदिस्त आणि एकाकी राहिलेल्या विद्यार्थ्यांना ऋतुरंग आणि क्रीडा महोत्सवामुळे मोठे व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमातून व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, परिस्तिथी हाताळण्याचे कौशल्य आणि नेतृत्व इत्यादी गुण विकसित होतात.
ऋतुरंग २०२२ या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विनोद पवार, समन्वयक प्रा. अदिती झगडे, प्रा. अश्विनी साळुंके सर्व शिक्षक, कर्मचारी त्याचबरोबर ओंकार देवकाते, मनोज जगदाळे, प्रतीक मोरे, सूरज कामडी, प्रतीक्षा, कुणाल पठाडे, केतन, आश्विन, मोहित, प्रतिमा काकडे, आशिष तावरे आणि इतर विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.