कोकणे नेत्र व त्वचा हॉस्पीटल येथे उच्च दर्जाचे नेत्र शास्त्रक्रियासाठी वापरणारे मायक्रोस्कोप मशीन चे उदघाटन संपन्न.
सदर मशीन लायका कंपनीचे जर्मन मेड असून जगातील अतिउत्कृष्ट डोळयावर मायक्रोस्कोपीक सर्जरी करणारी मशीन आहे

बारामती वार्तापत्र
डॉ. सचिन कोकणे यांनी डोळयाच्या रेटीना व इतर सर्व शास्त्रक्रिया करण्यासाठी कोकणे हॉस्पीटल येथे शास्त्रक्रिया विभागात बारामती शहरात प्रथमच नविन अत्याधुनिक मायक्रोस्कोप मशीन नेत्र रुग्णाच्या सेवेसाठी उपलब्ध केलेले आहे.
सदर मशीन लायका कंपनीचे जर्मन मेड असून जगातील अतिउत्कृष्ट डोळयावर मायक्रोस्कोपीक सर्जरी करणारी मशीन आहे.
सदर मशीनचे औपचारीक उद्घाटन पूजा करून डॉ. आर.पी. राजे, प्रसिध्द डॉक्टर व अॅड. अशोक प्रभुणे जेष्ठ वकिल, उपाध्यक्ष विद्या प्रतिष्ठाण बारामती यांच्या शुभहस्ते दि. २७/०९/२०२१ रोजी कोकणे हॉस्पीटल येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमात डॉ. राजे व अॅड. प्रभुणे यांनी डॉ. सचिन कोकणे यांच्या पुढील वैद्यकीय व्यवसायाठी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. सतिशमामा खोमणे इंजिनिअर श्री. कुचूर, डॉ. विजय कोकणे, डॉ. दिपीका कोकणे, डॉ. वर्षा कोकणे व डॉ. प्रशांत कोकणे व रुगणालयातील सर्व स्टाफ हजर होते.