जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास चे नाव पोलीस उपनिरीक्षक ‘रमेश भोसले’ होय.
पोलीस खात्यातून सेवा निवृत्त,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान.

जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास चे नाव पोलीस उपनिरीक्षक ‘रमेश भोसले’ होय.
पोलीस खात्यातून सेवा निवृत्त,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान.
बारामती: वार्ताहर जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर पोलीस खात्यात चाळीस वर्षे सेवा करून वयाच्या 58 व्या वर्षी बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश भोसले 31 मे 2020 रोजी सेवा निवृत्त झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपनगराध्यक्षा तररूम सय्यद, गटनेते सचिन सातव,अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,तालुका पोलीस निरीक्षक आप्पासाहेब घोलप, व पोलीस कर्मचारी उपस्तीत होते.
वयाच्या 58 व्या वर्षी सेवा निवृत्त होताना रमेश भोसले यांनी पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक पदा पर्यंत झेप घेतली आहे.प्रामाणिक कष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जवाबदारी वेळेत पूर्ण करणे,कधीही कोणतेही जवाबदारी सहजपणे पार पाडणे ही त्यांची खास खासियत होय.चाळीस वर्षाच्या सेवेत एकदाही त्यांना कामचुकार म्हणून शिक्षा किंवा दंड झाला नाही, चोरी,दरोडा,खून,अपहरण, आदी प्रकरणात त्यांनी उत्तम तपास केला आहे या बदल वेळोवेळी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.मोर्चा,आंदोलन,अनेक मान्यवरांचे बंदोवस्त आदी ठिकाणी सुद्धा त्यांनी उत्कृष्ट रित्या कर्तव्य पूर्ण केले आहे.सर्व सामान्य गरीब परिस्थिती मध्ये असताना सुद्धा कामाबद्दल आत्मीयता,जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर चाळीस वर्षे सेवा पोलीस खात्यातून पूर्ण करून एक आदर्शवत अधिकारी म्हणून निवृत्त होत आहे व त्यांच्या अनुभवाचा फायदा नवीन कर्मचाऱ्यांना झाला आहे. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांनी रमेश भोसले याना सेवा निवृत्ती बदल शुभेच्छा.