कोपरगाव शहरात कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष!
संपूर्ण जगभर धुमाकूळ घालत असलेला कोरोना आता कोपरगावातही पोहोचला असून कोपरगावातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी व कोपरगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मी वैयक्तिक व प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना करत आहे.
.
त्याच माध्यमातून आता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कोपरगाव शहरात प्रमुख ठिकाणी कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष बसवण्यात आले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे कोरोना निर्जंतुकीकरण कक्षामुळे शरीर निर्जंतुकिकरण होण्यास मदत होणार आहे.
.
विशेषतः वैद्यकीय कर्मचारी, साफ सफाई कर्मचारी, पोलीस व प्रशासकीय कर्मचारी यांना लॉकडाऊन मध्येही काम करावे लागत असून त्यांना तसेच जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या कोरोना निर्जंतुकीकरण कक्षांचा फायदा होणार आहे. प्राथमिक स्वरूपात तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री. साईबाबा तपोभूमी मंदिर, श्री. छत्रपती संभाजी महाराज चौक, भगवा चौक गांधीनगर आदी ठिकाणी कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून गरज पडल्यास आणखी कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.