कोराळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध.
बिनविरोध निवडणुकीची परंपरा ही या वर्षीही कायम राहिली
कोराळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध.
बिनविरोध निवडणुकीची परंपरा ही या वर्षीही कायम राहिली
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली . सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील तात्या भगत यांचे या संस्थेवर वर्चस्व आहे. १३ सदस्यांची बॉडी असलेल्या सिद्धेश्वर विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा ही या वर्षीही कायम राहिली आहे.
या निवडणुकीमध्ये विलास रामचंद्र भगत, नानासो गंगाराम माळशिकारे, नंदकुमार शंकरराव यादव, मारुती आप्पासो माळशिकारे, कृष्णा आबुराव भगत, दत्तात्रय जयसिंग खोमणे, सतीश नामदेव घोडे, युवराज दिनकर खोमणे, अशा नंदकुमार सावंत, मंजुळा शहाजी भगत, रामचंद्र नाना चव्हाण, चंद्रकांत बाबुराव भगत तसेच दत्तात्रय मारुती लव्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गुरुवार (दि:२०) रोजी नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने शेवटच्या दिवशी १३ अर्ज दाखल झाले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी देवकाते यांनी दिली.