कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व श्रावणामुळे मासळीचे भाव खालावले.
मच्छीमारांवर आले मोठे संकट.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व श्रावणामुळे मासळीचे भाव खालावले.
मच्छीमारांवर आले मोठे संकट.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान मांडलेले असताना या काळात देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाउन काळात अगोदरच अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच नुकत्याच चालू झालेल्या श्रावण महिन्यामध्ये खवय्यांनी पाठ फिरवली असल्याकारणाने माशांची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे.
सध्याचे दर अगोदरचे दर
चिलापी 15 ते 30 60 ते 110
वाम्ब 220 ते 250 350 ते 400
मरळ 180 ते 200 230 ते 250
काणस 10 ते 15 30 ते 40
रव 50 ते 60 100 ते 120
मरगळ 50 ते 60 100 ते 110
अशी माहिती तेजल फिश मार्केट चे आडतदार अंगद गायकवाड यांनी दिली.