कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच; पंतप्रधान मोदी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह घेणार बैठक.
कोरोना चाचणीचा वेग आणि त्यापुढील रणनीती याबद्दल चर्चा करणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच; पंतप्रधान मोदी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह घेणार बैठक.
कोरोना चाचणीचा वेग आणि त्यापुढील रणनीती याबद्दल चर्चा करणार आहेत.
जगभरासह देशातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दररोज ९० हजार ते एक लाख कोरोना रूग्णांची नोंद करण्यात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राज्य सरकारांशी बैठक घेणार आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक घेणार आहेत.
या राज्यांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब राज्यांचा समावेश आहे. तर या बैठकीत या राज्यांचे आरोग्य मंत्रीही सहभागी होतील. या राज्यात कोरोनाचे सर्वात जास्त कोरोना बाधितांचा आकडा असल्याने पंतप्रधान या पार्श्वभूमीवर संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी या सात राज्यांशी सद्य परिस्थिती, अनलॉकचा होणारा परिणाम, कोरोना चाचणीचा वेग आणि त्यापुढील रणनीती याबद्दल चर्चा करणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या सात राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्र, आंध्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये यापेक्षा पुढे आहेत. मात्र, मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात रिकव्हरी रेटमध्येही प्रचंड वाढ झाली असून दररोज हजारो लोक बरे होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या राज्यांची कोरोना सद्यस्थिती
• महाराष्ट्र – १२.४२ लाख कोरोनाबाधित, ३३ हजार मृत्यू
• आंध्र प्रदेश – ६.३९ लाख कोरोनाबाधित, ५४०० मृत्यू
• कर्नाटक – ५.३३ लाख कोरोनाबाधित, ८२०० मृत्यू
• उत्तर प्रदेश – ३.६४ लाख कोरोनाबाधित, ५२०० मृत्यू
• तामिळनाडू – ५.५२ लाख कोरोनाबाधित, ८९०० मृत्यू
• दिल्ली – २.५३ लाख कोरोनाबाधित, ५००० मृत्यू
• पंजाब – १ लाख कोरोनाबाधित, ३००० मृत्यू
या राज्यांपैकी, दिल्ली आणि पंजाब अशी राज्ये आहेत जिथे अलिकडच्या काळात कोरोना प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. दिल्लीत कोरोना प्रकरणांची दुसरी लाट सुरू असून चाचणी वाढल्यामुळे रूग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. देशाची चाचणी पाहिल्यास आतापर्यंत ६.५ कोटीहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक १२ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.