कोरोनाच्या काळात सामाजिक उपक्रम महत्वाचे :औदुंबर पाटील.
पोलीस स्टेशन व गुणवडी ग्रामपंचायत ला सॅनिटायझर मशीन वाटप.
कोरोनाच्या काळात सामाजिक उपक्रम महत्वाचे :औदुंबर पाटील.
पोलीस स्टेशन व गुणवडी ग्रामपंचायत ला सॅनिटायझर मशीन वाटप.
बारामती वार्ताहर : कोरोना सारख्या भयंकर महामारी मध्ये स्वतः पुढे येऊन आपल्या उत्पन्नातील काही रक्कम देऊन सॅनिटायझर मशीन वाटप करणे व कोरोना योध्याचा सन्मान करणे ही खरी गरज आहे हे कार्य म्हतपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. भारतीय आयुर्विमा महामंडळ चे शतकवीर विमा प्रतिनिधी महादेव आगवणे यांनी स्वखर्चाने कोरोना योध्या साठी ऑटो सॅनिटायझर मशीन चे शहर पोलीस स्टेशन,गुणवडी ग्रामच्यात कार्यालय व भारतीय आयुर्विमा कार्यालय या ठिकाणी वाटप व कोरोना योध्याचा सन्मान केला.
या प्रसंगी औदुबर पाटील बोलत होते या प्रसंगी गुणवडी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ सरस्वती गावडे,उपसरपंच सुनील गावडे,सदस्य अमर मुरूमकर,सतपाल गावडे,ग्रामसेवक मचिंद्र आटोळे,विकास अधिकारी सुनील जोगळेकर,वरिष्ठ शाखा अधिकारी संतोष पालकर आदी मान्यवर उपस्तीत होते.”कोरोनाच्या काळात सॅनिटायझर सहजपणे वापरता यावे या उद्देशाने मशीन उपलब्ध करून देणे व कोरोना योध्याचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपोसने हा उपक्रम आदर्शवत असल्याचे औदुंबर पाटील यांनी सांगितले.
“गुणवडी च्या नागरिकांना मदत करून भरीव कार्य केल्याचे” सरपंच सरस्वती गावडे यांनी सांगितले. या प्रसंगी महादेव आगवणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मदत करीत असल्याचे प्रास्तविक मध्ये सांगितले. आभार सुनील जोगळेकर यांनी मानले.