कोरोनाने विळखा आवळला… बारामतीत गेल्या २४ तासात ११ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू.
यातील चार जण बारामती तालुक्यातील असून उर्वरित बाहेरील तालुक्यातील आहेत. आज दिवसभरात मृत्यू पावलेल्या आठ जणांमध्ये बारामती शहरातील दोन व तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.
कोरोनाने विळखा आवळला… बारामतीत गेल्या २४ तासात ११ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू..
यातील चार जण बारामती तालुक्यातील असून उर्वरित बाहेरील तालुक्यातील आहेत. आज दिवसभरात मृत्यू पावलेल्या आठ जणांमध्ये बारामती शहरातील दोन व तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत उपचार घेत असलेल्या तब्बल ११ जणांचा दोन दिवसांत मृत्यू झाला. यामध्ये बारामती खेरीज इतर तालुक्यातील रूग्णांचा व सारी संशयित रुग्णाचा देखील समावेश आहे, मात्र शनिवारपासून बारामतीतील चिता अविरत धडधडत राहील्याने आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव बारामती तालुक्यात आज पाहायला मिळाले.
शनिवारी दिवसभरात सिल्व्हर ज्युबीली शासकीय रुग्णालय, रुई कोविड सेंटर व एका खासगी दवाखान्यात मिळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. यातील दोन जण हे बाहेरील तालुक्यातील होते असे सांगितले जात आहे.
आज रविवारी (ता.६) आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यातील चार जण बारामती तालुक्यातील असून उर्वरित बाहेरील तालुक्यातील आहेत. आज दिवसभरात मृत्यू पावलेल्या आठ जणांमध्ये बारामती शहरातील दोन व तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.
तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्णांचा कोरोना व सारी च्या आजारावरील उपचारासाठी बारामतीकडे येण्याचा ओढा वाढला आहे, त्यातून बारामती मध्ये गंभीर अवस्थेत पोहोचलेले व बारामतीच्या बाहेरील असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत, मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी की बारामतीकरांची ती राहत असल्याने त्यांची नोंद व त्यांचेवरील अंत्यसंस्कार बारामतीतच होत आहेत. दरम्यान मृत्यू झालेले इतर रुग्ण गेल्या काही दिवसांपासून गंभीर अवस्थेत होते व ते येथे उपचार घेत होते.