मुंबई

तीराला मिळणार इंजेक्शन, फडणवीसांच्या विनंतीनंतर पंतप्रधान मोदींकडून 6 कोटींचा कर माफ

रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या ५ महिन्यांच्या तीरावर आता उपचार केले जाणार आहे. या उपचारांमध्ये असलेला सर्वात मोठा अडथळा कर देखील आता माफ करण्यात आला आहे.

तीराला मिळणार इंजेक्शन, फडणवीसांच्या विनंतीनंतर पंतप्रधान मोदींकडून 6 कोटींचा कर माफ

रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या ५ महिन्यांच्या तीरावर आता उपचार केले जाणार आहे. या उपचारांमध्ये असलेला सर्वात मोठा अडथळा कर देखील आता माफ करण्यात आला आहे.

मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट


त्यामुळे तीरावर आता लवकरात लवकर उपचार होऊ शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीरा कामतच्या उपचारासाठी ६ कोटी रुपयांची करमाफी दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तीराच्या उपचार संदर्भात माहिती आणि येणारी अडचण कळवली होती. फडणवीसांच्या पत्राची दखल घेत मोदींनी सूत्र हलवली. अवघ्या 5 महिन्यांच्या तीरा कामत या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीराला अत्यंत दुर्धर आजारानं ग्रासलं आहे.

त्यासाठी थोडे थोडके नव्हे तर  १६  कोटींची आवश्यकता आहे.  कामत कुटुंबियांना लोकसहभागातून १६ कोटी रुपयांची मदत मिळाली. पण त्यातही एक अडचण उभी राहिली. अमेरिकेतून औषध मागवायचं असल्यानं त्यावर कर लागत होता. तो सुमारे ६ कोटींच्या आसपास होत होता. तो कर माफ करावा यासाठी कामत कुटुंबियांनी आणि काही कलाकारांनी देखील प्रयत्न केले. अमेरिकेतून आयात करावयाच्या औषधांवर सहा कोटी कर रक्कम कशी जुळवावी असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीराच्या कुटुंबियाची अडचण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या  लिहिलेल्या पत्राची पंतप्रधानांनी तत्काळ दखल घेत पूर्ण करमाफी दिली.

मुंबईतील रुग्णालयात तीरा कामतवर उपचार सुरू आहेत. तीरा एसएमए टाइप १ आजाराशी झगडत आहे. तज्ज्ञांच्या मते या आजारामुळे मुलीचे आयुष्य केवळ 18 महिन्यांपर्यंत असू शकते. या चिमुकलीला वाचवण्यासाठी अमेरिकेतील हे इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारकडून देखील कामत कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!