स्थानिक

 कोरोनामुळे दहीहंडी होणार नसल्याने मटक्यांना विक्री नाही; कुंभारांनी मांडली व्यथा

बारामती एकही मंडळाने मटकी खरेदी केलेले नाही.

कोरोनामुळे दहीहंडी होणार नसल्याने मटक्यांना विक्री नाही; कुंभारांनी मांडली व्यथा

बारामती एकही मंडळाने मटकी खरेदी केलेले नाही.

बारामती वार्तापत्र

गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पण गेल्या दोन वर्षांपासून वाढत्या कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने मटकी विकणाऱ्या कुंभारांचे मोठे नुकसान झाले आहे.मागच्या वर्षी लॉकडाऊन तसेच दुकानेच बंद होती. त्यामुळे एकही मटकी विकली गेली नव्हती. यंदा तर दुकान उघडले तरीही दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने फक्त 100 मटक्या विकल्या गेल्या आहे. याचा कुंभार समाजाला फटका बसला आहे.

बारामती शहरात दरवर्षी दहीहंडी मोठ्या उत्साहात सारी केली जाते. शहरातील विविध मंडळी देखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करत असतात. दर वर्षी साधारण ४०० ते ७०० मटकी करतो.मात्र कोरोनामुळे मागच्या वर्षी पूर्ण लॉकडाऊन असल्याने दुकानच उघडली नव्हती. यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. त्यामुळे यांना फक्त आम्ही २०० मटकी तयार केली. त्यातील फक्त शंभरच मटकी हे विकली आहेत. बारामती एकही मंडळाने मटकी खरेदी केलेले नाही. त्यामुळे दर वर्षी होत असलेल्या विक्रीवर मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे,अशी माहिती मटकी विक्रेते प्रमिला विनायक कुंभार यांनी दिली आहे.

गोकुळाष्टमी हा उत्सव मोठ्या थाटात सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते.रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन पूजन कीर्तन इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर्‍या दिवशी सोडतात. दुसर्‍या दिवशी शहरात गावा-गावांत चौका-चौकांत दही हंडी लावली जाते आणि कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!