कोरोनाला घाबरू नका-जि.प सदस्य अभिजित तांबिले.
कोरोनाजन्य परिस्थितीचा वरकुटे खुर्द येथे जाऊन घेतला आढावा.
कोरोनाला घाबरू नका-जि.प सदस्य अभिजित तांबिले.
कोरोनाजन्य परिस्थितीचा वरकुटे खुर्द येथे जाऊन घेतला आढावा.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोरोना विषाणू ग्रामीण भागात पसरत आहे. मात्र, कष्टकरी जनतेची रोगप्रतिकारकशक्ती जास्त असते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, असे मत जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी व्यक्त केले. वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथे कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावाला भेट देत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांच्या आरोग्या बाबत सर्व माहिती घेतली. गावातील स्वच्छतेबाबत संबंधित यंत्रणेशी चर्चा केली. या वेळी तांबिले म्हणाले, नागरिकांनी नियमितपणे गरम पाणी पिणे, गरम वाफ घेणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आणि कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना चांगली वागणूक द्यावी. या वेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, आरोग्य अधिकारी संजय भोसले. प्राजक्ता कोळी, संजय मारकड, बापूराव शिंदे, दत्तात्रय मिसळ, शिवाजी यादव, शशिकांत शेंडे, सोपान शेंडे, सचिन शेंडे, तुषार शेंडे, दत्तात्रय पवार, बंडु देवकाते, गणेश सोलनकर, दिलीप राउत, सागर भोसले, सुभाष मिसाळ, मधुकर भोग, ग्रामसेवक विठ्ठल मरगळ उपस्थित होते.