कोरोना चाचण्या वाढविण्यास प्राधान्य देण्याची गरज- हर्षवर्धन पाटील पाटील यानी घेतली तातडीने बैठक…
सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी आपले योगदान देऊन शहरात नागरिकामध्ये जनजागृती करावी..
कोरोना चाचण्या वाढविण्यास प्राधान्य देण्याची गरज- हर्षवर्धन पाटील
पाटील यानी घेतली तातडीने बैठक…
सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी आपले योगदान देऊन शहरात नागरिकामध्ये जनजागृती करावी..
इंदापूर :- (प्रतिनिधी) इंदापूर शहरात कोरोना वाढताना दिसत असून वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यास प्राधान्य देण्याची अधिकची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषद मध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये केले.
इंदापूर शहरारात बारा दिवसात कोरोनाचे 13 नवीन रुग्ण आढळून आल्याने बुधवार दि.17 जून रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेतली.यावेळी पाटील यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी डाॅ.प्रदीप ठेंगल,नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,गटनेते कैलास कदम यांनी शहरतील सद्यस्थिती व उपाययोजना या बाबत पाटील यांच्याशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना चाचण्याना अधिकचे प्राधान्य देण्याची गरज आहे.सध्या शहरी भागात कोरोनाचा विळखा वाढला असल्याने एन.आय.व्ही.मध्ये शहरातील कोरोना चाचण्याना अधिकचे प्राधान्य दिले जात आहे. साहजिकच त्यामुळे ग्रामीण भागातील तपासण्या कमी होतात. शिवाय तपासणी अहवाल मिळण्यासही विलंब लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एन. आय. व्ही. मध्ये जादा स्टाफ नेमून ग्रामीण भागातील तपाण्याना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनास काही सुचना देखील दिल्या. यावेळी पाटील म्हणाले कि, ज्यावेळी शहरात एकही रुग्ण नव्हता त्यावेळी नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत होते. मात्र आज परिस्थिती उलट आहे.शहरात रुग्ण वाढत असताना मात्र नागरिक याला गांभीर्याने घेत नाहीत. असे चित्र पहायला मिळत आहे.
याला रोखन्यासाठी नगरपरिषदेने राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राव्दारे अनुक्रमे इंदापूर शहरातील संपर्कातील नागरिकांच्या जास्तीत जास्त घशातील स्त्रवाचे नमुने तपासणीला प्राधान्य द्यावे. इंदापूर शहरातील नागरिकांच्या ऑक्सिजन लेवल तपासण्या करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास किट पुरवण्यात यावेत. शिवाय शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. या कामी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत मिळावी अशा अशायाच्या विविध मागण्या तात्काळ कराव्यात अशा सुचना हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.
याशिवाय शहरातील सर्वच नगरसेवक व पदाधिकारी यांनी आपले योगदान देऊन शहरात नागरिकामध्ये जनजागृती करावी. शहरातील वाढता धोका कसा कमी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात. बाहेरील शहरातुन इंदापूर शहरात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावरती लक्ष ठेऊन लक्षणे जावणताच याची कल्पना प्रशासनास द्यावी तरच हा संसर्ग आपण रोखू शकतो. तसेच नागरिकांनी व्यापाऱ्यानी स्वयंशिस्त ठेऊन शासनाच्या अटींच्या अधीन राहून व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरातील जनतेला केले आहे.
यावेळी शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, नगरसेवक जगदीश मोहीते,पांडुरंग शिंदे,गुड्डू मोमीन, रमेश धोत्रे,जावेद शेख आणि नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते