
कोरोना चा चौथा बळी बारामती तालुक्यात.
जळोची येथील 54 वर्षीय नागरिकाचा आज मृत्यू.
बारामती:वार्ताहर बारामती तालुक्यातील जळोची येथील 54 वर्षीय नागरिकाचा आज कोरोना मुळे मृत्यू झाल्यावर कोरोनाचा तालुक्यातील चौथा बळी झाला आहे.
अशी माहिती तालुका अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली त्याचा हा व्हिडिओ ????????
रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
दोन दिवसांपूर्वी जळोची येथील 54 वर्षीय व्यक्तीस धाप लागणे, अशक्तपणा, न्युमोनियाची लक्षणे होती. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खासगी दवाखान्यात डॉक्टरांकडे तपासणीसाठी दाखल केले. मात्र त्यांची लक्षणे पाहताच डॉक्टरांनी त्यांना रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला.
त्यावरून काल (ता.७) या रुग्णास रुई येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोरोनाग्रस्ताची बारामतीतील सुरवात जळोचीतून झाली होती, त्यानंतर बारामती शहर, तांदूळवाडी, माळेगाव, वडगाव निंबाळकर, सावळ, लोणीभापकर, काटेवाडी, मुर्टी, कोऱ्हाळे या गावांबरोबर आता जळोची गावठाणाचा देखील कोरोनाग्रस्तात समावेश झाला आहे.
दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कातील १० जणांची कोरोना चाचणी होणार असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.
त्यांचा मृत्यू झाला.बारामती तालुक्यातील हा चौथा कोरोनाचा बळी ठरला आहे.