स्थानिक

कोरोना चा फैलाव फक्त हाॅटेल मधूनच होतो का?? संतप्त हाॅटेल चालकांचा सवाल.

कोरोना चा फैलाव फक्त हाॅटेल मधूनच होतो का?? संतप्त हाॅटेल चालकांचा सवाल.

कोरोनामुळे सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

बारामती वार्तापत्र

एकट्या बारामती शहरात 40 छोटी मोठी हॉटेल्स, 24 स्वीट होम्स आहेत. या सर्व व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कर्मचा-यांचीही संख्या लक्षणीय आहे. सध्या पार्सल सुविधेस प्रशासनाने परवानगी दिलेली असली तरी ग्राहक हॉटेलमध्ये येऊन जेवण केल्यानंतर जो व्यवसाय होतो तसा व्यवसाय होत नसल्याने हॉटेलमालक चालक आर्थिक संकटात आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल्स बंद आहेत, त्या मुळे कर्मचा-यांचे पगार करण्यासह वीजेचे बिल, घरपट्टी, जागाभाडे, जीएसटी, इनकम टॅक्स, सेल्स टँक्स, लक्झरी टॅक्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बँकेचे कर्ज व त्या वरील व्याज हे कोठून भागवायचे असा प्रश्न अनेकांपुढे आहे. अनेक जणांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन आपले व्यवसाय सुरु केलेले आहेत, त्यांच्या पुढे तर अडचणींचे डोंगर  उभे आहेत.

शासनाने आता हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही हॉटेलचालक संपूर्णपणे अडचणीत येणार आहोत. अनेकांची अवस्था बिकट आहे, त्या मुळे तातडीने आम्हाला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दयावी

– बाॅबी आहुजा, हॉटेलचालक.

 

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

इतर सर्व बाबी खुल्या करताना तेथेही गर्दी होणारच आहे, बँकांसह इतर अनेक दुकानातूनही गर्दी होतेच, मग हॉटेलचालकांवरच अन्याय का केला जात आहे. हॉटेल चालक सर्व काळजी घेत असतानाही सुरु करण्याची परवानगी दिली जात नाही हे दुर्देवी आहे.

– योगेश ढवाण , हॉटेल चालक

 

गेल्या अनेक दिवसांपासून सलगपणे हॉटेल बंद असल्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर झालेला आहे. आर्थिक घडी विस्कटू लागल्याने अडचण निर्माण होते आहे. शासनाने आता हॉटेल व्यावसायिकांना अनुदान देण्याची गरज आहे विविध करसवलतींचीही गरज आहे.

– फिरोजभाई मुजावर, हॉटेल चालक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram