
कोरोना ने मृत पावलेल्या नामदेवांच्या कुटूंबियास मित्रांची मदत
पंच्याहत्तर हजार रुपये ची मदत
बारामती वार्तापत्र
बारामती: तुळजाराम चतुरचंद महाविद्यालया यातील 1995 साल ची बॅच चा विद्यार्थी नामदेव पांडुरंग ढोले (वय वर्ष 50 ) यांचे 25 मार्च रोजी कोरोना ने निधन झाले घरातील कुटूंब प्रमुख च गेल्याने सर्व सदस्य मानसिक, आर्थिक खचले परंतु त्याच बॅच चे सर्व विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन वर्गणी जमा करून पंच्याहत्तर हजार रुपये ची तेरा महिन्याची मुदत ठेव मुलगी ऋतुजा हिच्या नावे पुढील शैक्षणिक खर्चा साठी म्हणून ठेवण्यात आली तर उर्वरित रक्कम बचत खात्यात ठेवण्यात आली दुःखाच्या समयी सर्व मित्रांनी एकत्रित येऊन कुटूंबियास मानसिक आधार तर दिलाच व आर्थिक मदत करून स्वर्गीय मित्रास एक प्रकारे आदरांजली वाहण्यात आली.
या साठी शशिकांत सोनवणे, मनीष आहेर, संभाजी जाधव, शामसुंदर सोनी व सौ रुपाली शहा व अपर्णा पालकर डोळ यांनी पुढाकार घेतला.