कोरोना प्रतिबंध जनजागृतीसाठी शिक्षकाचे स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास

WHO व UNICEF तसेच भारत सरकारच्या ऑनलाइन स्वयंसेवेत देखील डॉ.अमोल बागुल यांचे योगदान

अहमदनगर जिल्हा प्रशासन व नगर तहसील कार्यालयाच्या आपत्ती प्राधिकरण समितीच्या भरारी पथकामध्ये तसेच WHO व UNICEF तसेच भारत सरकारच्या ऑनलाईन स्वयंसेवा प्रक्रियेमध्ये येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल गेल्या महिनाभरापासून स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास आपले योगदान देत आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह, जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच नगर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उमेश पाटील, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बागुल काम करीत आहेत.आपत्ती प्राधिकरण समितीच्या कार्यवाहीनुसार नगर शहर व नगर तालुक्यातील विविध नियोजित ठिकाणांवर जाऊन भरारी पथकाच्या वाहनावर ध्वनिक्षेपकातून दैनंदिन निवेदन, मास्क लावणे, अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानासमोर सोशल डीस्टसिंग नियमाचा वापर करत चौकोन,वर्तुळ आखण्यासाठी आग्रह धरणे, प्रशासनाच्या आवश्यक सूचनांचा प्रचार-प्रसार करणे, कोरोना प्रतिबंधक कालावधीतील नियम व कायदे यांची माहिती देणे, विलगीकरण प्रक्रियेबद्दल माहिती देणे,आपली वाहने घेऊन अनावश्यक फिरणाऱ्यांना सूचना व समज देणे, शिवभोजन थाळी, बँका, स्वस्त धान्य दुकाने आदी आस्थापनासमोरील उभ्या नागरिकांना सोशल डीस्टसिंग

नुसार उभे करणे,हॉटस्पॉट ठिकाणांवरील उद्घोषणा आदी कामांमध्ये डॉ.बागुल दिवसातले ६ ते ७ तास देत आहेत. अहमदनगर जिल्हा पोलीस दल, जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालये,अहमदनगर महानगरपालिका इत्यादी कार्यालयाच्या वाहनांसाठी कोरोना प्रतिबंध प्रचार ध्वनिफीत बनवणे उपक्रमात देखील बागुल यांचे योगदान आहे.

युनिसेफ व WHO च्या माध्यमातून दैनंदिन ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील व्हिडिओ तथा ग्राफिक डिझायनिंग बनवून पाठवणे तसेच त्यांच्या प्रबोधनपर सूचना व व कोरोना प्रतिबंध योजनांचा प्रचार-प्रसार करणे,भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या “स्वयंसेवक व कोरोना वॉरियर्स” योजनेअंतर्गत युनिसेफ वूमन व आरोग्य मंत्रालयाच्या श्री शक्ती चॅलेंज स्पर्धेचा प्रचार-प्रसार,आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे, covid-19 इनोव्हेशन संशोधन स्पर्धा, covid-19 सोल्युशन चॅलेंज स्पर्धा,जनता कर्फ्यू तसेच स्टे होम स्टे सेफ ऑनलाइन प्रतिज्ञा पोर्टलचा ऑनलाइन प्रचार-प्रसार आदी गोष्टींसाठी बागुल दररोज २ते३ तास देत आहेत.

जनता कर्फ्यूनंतर बागुल यांनी अनेक अधिकाऱ्यांना फोन करून विनंती केली की “देशासह महाराष्ट्र व नगर शहर व जिल्हा अशा प्रतिकूल परिस्थितीत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता घरात बसू शकत नाही.आपण जनजागृतीचे अथवा कुठलेही काम मला द्यावे , स्वतःची सुरक्षा घेत व कसलीही अपेक्षा न करता मी आपण द्याल ते काम करू इच्छितो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!