रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
त्याच्या या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
त्याच्या या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे. त्यांनी आज मुंबईत आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते हे पहावं लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या जागी प्रदेश उपाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एके काळची मैत्रीण चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर यांच्यातील राजकीय वाद राज्यभर रंगला होता.
त्यांनी या संधीच सोनं करत वेळोवेळी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात अनेक वेळा शाब्दिक युद्ध सुद्धा पाहण्यास मिळालं.