कोरोना बाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडली.
कोरोना बाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडली.
बारामती वार्तापत्र
यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, उपवनसंरक्षक वन विभाग पुणे राहूल पाटील, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, जिल्हा परिवहन अधिकारी रमाकांत गायकवाड, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, डाॅ. महेश जगताप,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषद पुणे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.
बारामती तालुक्यामधील कोरोनाचा प्रादुर्भावा बाबतचा सद्यस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहे. प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांच्या नियमांचे सर्व नागरिकांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांनी बाजारपेठे मध्ये जाताना सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा मिळण्यास विलंब होता कामा नये, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी सूचना देखील त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.