कोरोंना विशेष

कोरोना योद्धे साठी मास्क व फेस शिल्ड चे वाटप..

कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासन - पोलिस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी करत.

कोरोना योद्धे साठी मास्क व फेस शिल्ड चे वाटप.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासन – पोलिस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी करत असलेले उल्लेखनीय कार्य आहे व हेच खरे कोरोना योद्धे आहेत. कोरोना योध्ये दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत व सर्व नागरिकांचे रक्षण करित आहेत.या करोना विरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी बारामती अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय ,रुई ग्रामीण रुग्णालय येथे करोना योध्यांसाठी गिफ्ट्स अव्हेन्यू चे अभिजित बोरा , स्काय ऍग्रोचे केतन भोंगळे, योगेश राऊत ,युनिक ग्लासचे उमेश पांढरे पाटील यांचे वतीने फेस शील्ड व मास्क देण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व रुई ग्रामीणचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुनील दराडे व डॉ.संजय घुले उपस्थित होते. कोरोना योद्धे म्हणून या सर्वांचे कार्य

उल्लेखनीय व अतुलनीय आहे म्हणून त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे व याचा आदर्श प्रत्येक नागरिकांनी करावा या पुढील काळातही कोरोना बरोबर लढाई आहे त्यामुळे सर्वांनी मास्क,सॅनिटायझर यांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे असे मत अभिजित बोरा यांनी व्यक्त केले.स्वागत उमेश पांढरे यांनी केले तर आभार केतन भोंगळे यांनी मानले

फोटो ओळ: फेस मास्क व शिल्ड वितरण चे पत्र देताना चंद्रशेखर यादव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!