
अखेर ‘ तो ‘ साखळी चोर सापडला
बारामती पोलिसांची कारवाई तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण,चैन हिसकावुन चोरी करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. पोलिसही या गुन्हेगारांच्या मागावर होते. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
https://t.me/baramatiwarta
त्याप्रमाणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यात अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे वय 24 वर्ष रा कोऱ्हाळे बु. याने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. खोमणे याच्याकडे अधिक विचारपूस करता त्याने पोलिसांना कबुली दिली की मी व माझा साक्षीदार चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे वय 32 निरा व राहुल पांडुरंग तांबे वय 28 जेऊर ता. पुरंदर असे तिघांनी मिळून बारामती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन महिलांचा पाठलाग करून त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरी करून नेले पोलीस कस्टडी तील आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याचे कडुन तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण तीन लाख रुपये किमतीचे वेगवेगळे सोन्याचे गंठण असा सहा तोळे वजनाचे सोने आरोपीकडून पोलिसांना हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे करीत असून अटक आरोपी पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दरोड्याचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉअभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे ,सचिन शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस नाईक रुपेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी ,अजित राऊत, तुषार चव्हाण ,अकबर शेख ,अशोक शिंदे यांनी केली.