कोरोना योध्याची समाज्यात खरी गरज.
सामाजिक भान जपले पाहिजे.
बारामती:वार्तापत्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर पैसा मिळवण्या पेक्षा खऱ्या अर्थाने सामाजिक भान जपत निस्वार्थी व कर्तव्य निष्ठ काम केले पाहिजे हे डॉ राहुल जाधव यांनी दाखवून दिले आहे.
आरोग्य हॉस्पिटल, चिमणशाह मळा, बारामती दिनांक १५/०७/२०२० रोजी तांबोळी समाजाच्या कार्यकारणीचे पदाधिकारी श्री. युसूफभाई शब्बीरभाई तांबोळी यांना हलकासा ताप, खोकला, सर्दी जाणवू लागली. त्यांनतर कसब्यातील फॅमिली डॉक्टर श्री. हारके यांना त्यांच्या ओ.पी.डी. मध्ये दाखवून घेतल्यानंतर त्यांनी हृदयाचा एक्स-रे काढण्यास सांगितले. एक्स-रे मध्ये निमोनियाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी रूई कोविड सेंटर येथे जाऊन स्वब देण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी स्वब दिल्यानंतर स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आला परंतु निमोनिया जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्ही पुढील उपचारासाठी जेथे ऑक्सीजन व्हेंटीलेटरची सुविधा असेल अशा हॉस्पिटलला उपचारासाठी जाण्याचा सल्ला डॉ. हारकेंनी दिला. सदरचे पेशंट घेऊन मी काहाटी गावचे सुपूत्र व आमचे मित्र डॉ. राहुल बबनराव जाधव यांच्या ‘आरोग्य हॉस्पिटल’ मध्ये पेशंट घेऊन गेलो. त्यांनी सदरचा एक्स-रे पाहून आपण प्रयत्न करूया असे सांगून उपचारास सुरूवात केली. परंतु दिवसेंदिवस निमोनियाचे प्रमाण छातीमध्ये जास्त होत गेले स्वब जरी निगेटिव्ह आला होता परंतु सदरची लक्षणे एकंदरीत कोविड सारखीच होती. त्यादृष्टीने ईलाज करणे गरजेचे झाले व संबंधीत पेशंटच्या संदर्भातील सर्व माहिती नातेवाईकांना बारकाईने देऊन पहिल्यांदा त्यांनी फॅबी फ्ल्यू उपलब्ध करून संबंधीत पेशंटला दिली, तरीसुध्दा पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला नाही. परंतु डॉक्टर श्री. राहुल जाधव यांनी धीर न सोडता आम्हा सर्व नातेवाईकांनाही विश्वासात घेऊन आपण पेशंटला रेमिडीज्वेअर
इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यानंतर प्रकृतीत सुधार होईल आपलं पेशंट पुर्णपणे बरे आपण आशावादी राहू, प्रत्येक डॉक्टर हा आपल्या क्षेत्रातील एक आर्टीस्टच आहे व तो आपल्या पेशंटच्या प्रती संवेदनशील राहूनच त्याचे प्रयत्न करीत असतो आणि मीसुध्दा तोच प्रयत्न आपल्या पेशंटच्या बाबतीत करीत आहे हे बोलत असताना डॉ. राहुल जाधव हे एका दुष्काळी जिरायत पट्टयातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते आज एक प्रतिष्ठीत हॉस्पिटलचे डॉक्टर असल्याचा कोणताही गर्व किंवा अहमपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही त्यांच्यामध्ये वैद्यकीय पेश्याशी अत्यंत प्रामाणिक व संवेदनशीलता दिसली. त्यांनतर त्यांनी सदरचे इंजेक्शनवर शासकीय नियमानुसार ते कोणत्या कागदपत्रांच्या पुर्ततेत उपलब्ध करता येईल याचे मार्गदर्शन करून ते इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास माहिती दिली व ते इंजेक्शन उपलब्ध झाले. सदरचे इंजेक्शन दिल्यानंतर सुध्दा पेशंटच्या प्रकृतीत थोडा फार सुधार झाल्याचे लक्षात आले. परंतु डॉ. राहुल जाधव यांचे हॉस्पिटल हे कोविड सेंटर नसल्यामुळे त्या पेशंटला पुढे व्हेंटीलेटरची फार आवश्यक्ता होती व सदरचे पेशंट हे वेगळ्या विभागात आयसोलेट करून उपचार चालु होते, परंतु त्याठिकाणी व्हेंटीलेटरची सुविधा नव्हती. तरीसुध्दा
पेशंटच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थितीचा विचार करून डॉ. राहुल जाधव यांनी त्यांच्या दवाखान्यात पेशंट ठेवलेल्या विभागात व्हेंटीलेटरची सुविधा नसताना त्यांनी नवीन बायकॅप मशीन खरेदी करून उपलब्ध केले.
त्यानंतर बारामतीमधील बऱ्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी आम्ही भेटलो त्यांना पेशंटचा निमोनियाचा एक्स-रे व रिपोर्ट दाखविल्यानंतर सदरचे पेशंट हे कोविडच आहे हे सांगून त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला आयसोलेशन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे स्पष्ट शब्दात पेशंट अ ऐडमिट करून घेण्यास नकार दिला व टाळाटाळ केली. त्यानंतर आम्हास प्रश्न पडला की, सदरचे पेशंट हे निगेटिव्ह रिपोर्ट असुन सुध्दा त्याला व्हेंटीलेटर मिळत नाही कारण डॉक्टर खाजगीत म्हणत होते की, या पेशंटची लक्षणे एकंदरीत ‘कोरोना’ सारखीच आहेत. या अवस्थेत आम्ही प्रत्येक दवाखान्याची पायरी झिजवत होतो परंतु बारामती मधील कोणतेही डॉक्टर आम्हास साथ देत नव्हते. अशा अवस्थेत आम्ही काय करावे हेच आम्हा सर्व कुटूंबियांना सुचत नव्हते. परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांना मेसेजद्वारे सर्व परिस्थिती कळविण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांचे पी.ए. श्री. मुसळे साहेब यांचेशी बोलणे केले त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. त्यानंतर आम्ही ज्येष्ठ नगरसेवक मा. किरणदादा गुजर यांच्या कानावर सर्व प्रकार सांगितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बारामती हॉस्पिटल तसेच सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलचे डॉ. श्री. सदानंद काळे यांचेशी चर्चा करून यासंदर्भात आपल्याला काय मदत करता येईल? ही माहिती घेतली त्यानंतर त्यांनी रूई कोविड सेंटर हॉस्पिटलचे डॉ. राहुल मस्तुद यांचेशी चर्चा करून सदर पेशंटचा पुन्हा स्वब घेण्याची विनंती केली व डॉ. राहुल मस्तुद यांनीसुध्दा मनाचा मोठेपणा व आपले कर्तव्य श्रेष्ठ आहे हे समजून स्वतः ‘आरोग्य हॉस्पिटल’ बारामती येथे येऊन आमच्या पेशंटचा स्वब घेतला यात किरणदादा व डॉ. राहुल मस्तुद यांचेसुध्दा विशेष योगदान व सहकार्य
राहीले. दुसऱ्या दिवशी सदरच्या पेशंटचा रिपोर्ट ‘सारी कोविड’ मध्ये आला आणि सदरचे पेशंट हे पुढील उपचार व व्हेंटीलेटरसाठी रूई हॉस्पिटलला शिप्ट करण्याची तयारी झाली व पेशंट शिफ्ट केले. त्यानंतर रूई हॉस्पिटलचा स्टाफ सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य करून आमच्या पेशंटला जिवनदान देण्यासाठी मोलाची भुमिका बजावली त्याबद्दल सर्व डॉक्टरर्स व कर्मचाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत.
सध्या आमचा पेशंट हा पुर्णपणे कोरोना मुक्त होऊन घरी आला असून या सर्व परिस्थितीमधून जवळून गेल्यानंतर कोरोना पेशंटांना समाजामध्ये कशाप्रकारे वागणुक दिली जाते व संबंधीत कुटुंबाला मेडीकल सुविधा उपलबध न झाल्यामुळे होणारा मानिकस त्रास हा किती भयावह असतो परंतु काही डॉक्टरांमध्ये देखील आपले कर्तव्य व वैद्यकीय क्षेत्राशी असणारी निष्ठा ठेवून देवदूतासारखे डॉ. राहुल बबनराव जाधव व त्यांच्यासारखे ईतर अनेक डॉक्टर आपली भुमिका व कर्तव्य चोखपणे पार
पाडत आहेत.