कोरोंना विशेष
कोरोना रूग्णांच्या संपर्कातील २४ जणांचा अहवाल निगेटिव्ह.
बारामती करांसाठी काहीशी दिलासादायक बातमी.
कोरोना रूग्णांच्या संपर्कातील २४ जणांचा अहवाल निगेटिव्ह.
बारामती करांसाठी काहीशी दिलासादायक बातमी…
बारामती:-प्रतिनिधी
बारामतीमध्ये सोमवार दि.१३ रोजी दिवसभरात पाचजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर लक्षणे आढळलेल्या २४ जणांची कोरोनाची तपासणी आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आली होती.
त्यामध्ये सर्वंच्या सर्व जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे बारामतीकरांना काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे. दुसरीकडे आजही नव्याने वेगवेगळ्या लोकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती डाॅ. सुनिल दराडे,डाॅ.मोनज खोमणे यांनी दिली.