कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळणाऱ्या हॉटेल वर कारवाई
विनामास्क केसेस- ७०७ विनामास्क दंड- ३,२५,५००/-रूपये

कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळणाऱ्या हॉटेल वर कारवाई
विनामास्क केसेस- ७०७ विनामास्क दंड- ३,२५,५००/-रूपये
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील
प्रशांत बियर शॉपी, चव्हाण वस्ती माळेगाव, ता. बारामती, जि.पुणे.आबासो भानुदास तुळशंकर, रा.काटेवाडी, ता.बारामती, जि. पुणे. यांनी संचारबंदी आदेशाचे उल्ल्धन करून प्रशांत बियर शॉपी चे शटर उघडे ठेवून आतमध्ये विना मास्क बसलेले मिळून आले आहे. म्हणुन त्यांनी मा.जिल्हाधिकारी सो पुणे. यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणुन बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी वरील आरोपी विरूध्द भा.द.वि. कलम १८८,२६९,२७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम कलम ५१, साथीचे रोग अधि. कलम ३,४, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील गुन्हयाचा तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशाने पुणे ग्रामीण पोलीस दल हद्दीत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये पारीत केलेल्या आदेशाची अवहेलना केलेल्या इसमांवर आज रोजी खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
विनामास्क केसेस- ७०७
विनामास्क दंड- ३,२५,५००/-रूपये