स्थानिक
कोरोना वॅक्सिन साठी आलेल्या फोन कॉलला उत्तर देऊ नये – नारायण शिरगावकर
फोन कॉलला कोणतीही माहिती देऊ नका अन्यथा तुमचे बँकेतील पैसे गायब होतील

कोरोना वॅक्सिन साठी आलेल्या फोन कॉलला उत्तर देऊ नये – नारायण शिरगावकर
फोन कॉलला कोणतीही माहिती देऊ नका अन्यथा तुमचे बँकेतील पैसे गायब होतील
बारामती वार्तापत्र
कोरोना वॅक्सिन साठी आलेल्या फोन कॉलला कोणतीही माहिती देवु नका, रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागणार, नंतर सांगणार टी पी दिला की तुमचे नाव रजिस्टर होईल. पण चुकूनही अजिबात माहिती सांगू नका. नाहीतर तुमचे बँक बॅलन्स खाली झाले म्हणून समजा.
करोना वॅक्सिनबाबत कोणतीही शंका असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घ्या. घाई करू नका. सावध राहा आणि काळजी घ्या. कोणीही आपल्या फायद्यासाठी आपल्याकडे येत नाही त्यामध्ये त्यांचा फायदा लपलेला असतो. त्यामुळे कोणीही अशा फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन शिरगावकर यांनी केले आहे.