कोरोना संकटमुक्तीसाठी सामुहिक श्री साईसच्चरित्र वाचन – विजय कोते
शिर्डी
सामुहिक श्री साईसच्चरित्र वाचन …..
शिरडीतील प्रत्येक घरात ….. सहकुटुंब सहपरीवार…
अनुभव साईबाबांच्या सामुहिक भक्तीचा
गेल्या दोन महिन्यापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार घातलेल्या कोरोनाशी आपले प्रशासनातील योध्दे मग त्यामध्ये पोलीस, डॉक्टर, नर्सेस, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांचे मनापासून आभार तर मानलेच पाहिजे व आपण घरात बसून या सर्वांसाठी आपल्याला साईबाबांकडे प्रार्थना करायची आहे कि या सर्वांवर बाबा आपले आशिर्वाद कायम असू द्या … तसेच या विषाणूचा संपूर्ण जगातून लवकरात लवकर नायनाट व्हावा यासाठी साईबाबांकडे साकडे घालू या….
**गोधून नाही ती महामारी । भरडावया जात्यांत वैरी । तो मग भरडा शिवेवरी । उपराउपरी टाकवी ।।१३४।। पीठ टाकिंले ओढियाकांठी । तेथूनि रोगासी लागली ओहटी । दुर्दिन गेले उठाउठी । हे हातोटी बाबांची ।।१३५।। गांवांत होती मरीची साथ । करिती हा तोडगा साईनाथ । झाली रोगाची वाताहत । गांवास शांतत्व लाधले ।।१३६।।**
श्री साईसच्चरित्र अध्याय क्र. 1 मध्ये साईबाबांनी स्वतः त्या वेळी आलेल्या महामारी वर कशी मात केली हे सांगितले आहे….म्हणून आपण सर्वजण उद्या गुरुवार दि.14 मे रोजी हाच 1 नंबरचा अध्याय सामुहिक वाचणार आहोत…
चला तर मग या कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी व कोरोनाच्या नायनाटासाठी सामुहिक पध्दतीने साईबाबांकडे प्रार्थना करून त्यांच्यासह आपण ही सहकुटुंब साई बाबांची सेवा व आशिर्वाद मिळवू या…
अध्याय वाचन स्वतः किंवा घरातील सदस्यांनी करायचे आहे.
**सामुहिक अध्याय वाचनाची रूपरेषा..**
सकाळी 11वा. स्तवन मंजिरी वाचनास सुरुवात करून आपल्याला मिळाल्याल्या अध्यायाच्या वाचनास सुरुवात करून दु.12 वाजता सहकुटुंब बाबांची आरती करावी…
*या साईसच्चरित्र पारायणास आपण सर्व साईभक्तांनी सहभाग नोंदवून सदगुरू श्री साईबाबांचे शुभ आशिर्वाद घेवूयात….
*जय साईनाथ !! *ओम साई राम* !!
असे आपल्याला पाच गुरूवार करायचे आहे, या गुरूवारी 14 मे ला शिरडीतून या साईसच्चरित्र पारायणास सुरूवात होईल, त्यानंतर पुढील गुरूवारी 21 मे रोजी राहाता तालुका, 28 मे रोजी अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्र, 4 जून रोजी संपूर्ण भारत देश, व पाचव्या गुरुवारी 11 जूनला संबंध विश्वभरात साईसच्चरित्राचे वाचन हे साईभक्त करणार आहेत…
विजय कोते साई निर्माण उद्योग समूह शिरडी, साई संदेश प्रतिष्ठान रुई, साई द्वारकामाई प्रतिष्ठाण शिरडी.