शैक्षणिक

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजणार;शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजणार;शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.

प्रतिनिधी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतची शाळा सुरु करण्याचा निर्णय आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शाळेल शिक्षण विभागानं मांडला होता. त्याला आज राज्य सरकारनं मान्यता दिलीय. दरम्यान, शाळा सुरु होत असताना कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नियमावली पाळण्याचं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलंय. त्यासाठी यापूर्वी शाळा सुरु करण्याच्या निर्णयावेळी राज्य सरकारनं दिलेली नियमावली पाळली जावी, असं गायकवाड म्हणाल्या

शाळा सुरु करण्याबाबत सरकारची नियमावली काय?

>> शक्य असल्यास प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक सुरु करावं

>> विद्यार्थ्यांचं तापमान नियमीतपणे तपासावं

>> शक्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी

>> सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात

>> हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी

>> यासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा

विद्यार्थी आणि पालकांसाठी सरकारच्या सूचना

  • मुलांना शाळेत चालत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं
  • ज्या शाळांमध्ये खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात त्या वाहनात एका सीटवर एक विद्यार्थी प्रवास करेल याची काळजी घ्यावी
  • विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना चालक आणि वाहकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावं

शिक्षकांसाठीही महत्वाच्या सूचना

  1. जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
  2. वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
  3. वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
  4. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
  5. कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
  6. खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
  7. खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.

Related Articles

Back to top button