कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या एका मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी अडीच महिने वाट पाहावी लागली
तेव्हा आमच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या एका मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी अडीच महिने वाट पाहावी लागली
तेव्हा आमच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
उत्तर प्रदेशच्या सरकारी शवागारात एका मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी अडीच महिने वाट पाहावी लागली. कारण, सरकारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांकडे कथितरित्या 15 हजारांची लाच मागितली होती आणि ते ती देऊ शकले नाहीत.
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नरेश (वय 39) यांच्यावर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं गुरुवारी (1 जून) हापूडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेश यांच्या पत्नी गुडिया यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं, “त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये मृतदेह घ्यायला गेलो, तेव्हा आमच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पण, आम्ही ते देऊ शकलो नाही.”
पण, मेरठ मेडिकल कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेंद्र कुमार लाच मागितल्याचा आरोप फेटाळून लावतात.
ते सांगतात, “नरेश यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये आले होते, पण ते मृतदेह न घेताच परत गेले. तसंच कुटुंबीयांचा फोनही सारखा बंद येत होता.”
पतीवर अंत्यसंस्कार
माझ्याकडे 15 हजार रुपये नव्हते, अशावेळी तिथून निघून येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय काय होता? असा सवाल गुडिया करतात.
त्यांच्यावर सरकार अंत्यसंस्कार करेल, असंही सांगण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
नरेश कुमार हे हापूडमध्ये एका टपरीवर मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ विकत असत.
एप्रिलमध्ये तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना हापूडमधल्या सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आलं. तिथून त्यांना मेरठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथं त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

फोटो कॅप्शन,नरेश यांची पत्नी गुडिया
मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये भरती झाल्याच्या 2 दिवसांनंतर 15 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांचा मृतदेह काही दिवस शवागारात पडून राहिला, तेव्हा मेरठ हॉस्पिटलनं हापूड प्रशासन आणि सरकारी दवाखान्याशी संपर्क केला, कारण ही केस तिथूनच त्यांच्याकडे आली होती.
हापूडच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं, “मेरठहून मृतदेह हापूडला मागवण्यात आल्यानंतर तिथं त्याला शवागारात ठेवण्यात आलं. त्यानंतर नरेश यांच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी प्रशासनाची मदत घेण्यात आली. “
पोलीस निरीक्षक उत्तम कुमार शर्मा यांनी सांगितलं की, “आम्ही नरेश काम करत असलेल्या ठिकाणच्या दुकानदारांबरोबर चौकशी केली आणि मग एकएक गोष्टी समोर येत गेल्या. यातून आम्ही नरेश यांचे घरमालक आणि मग त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलो.”

फोटो स्रोत
यादरम्यान कुटंबीयांनी गावात त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार मृत्यूनंतरच्या विधी केल्या होत्या.हापूड प्रशासनाच्या मदतीनं नरेश यांची पत्नी गुडिया यांना शहरात आणण्यात आलं. तिथं त्या पतीवर अंत्यसंस्कार करतेवेळी स्मशानभूमीत उपस्थित राहू शकल्या.