कोऱ्हाळे बुद्रुक चे युवा शेतकरी अजित पोमणे सर्वोत्कृष्ट उपक्रमशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित
शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान
कोऱ्हाळे बुद्रुक चे युवा शेतकरी अजित पोमणे सर्वोत्कृष्ट उपक्रमशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित
शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान
इंदापूर: सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील प्रगतिशील युवा शेतकरी अजित मनोहर पोमणे यांना शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुधवारी (दि. १२) रोजी जागतिक युवा दिनानिमित्त कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लि.,नाशिक व महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्टअप्स फेडरेशन यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित सोहळ्यात नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते सन-२०२०-२१ सालचा सर्वोत्कृष्ट उपक्रमशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, आत्मा नाशिक विभागाचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड ऑग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, अँग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीज व कृषिभूषण ग्रोवर्स प्रो. कं. लि.,नाशिकचे अध्यक्ष भूषण निकम,चावडी उद्योग समूहाचे अध्यक्ष अमित मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकेकाळी स्ट्रॉबेरीचे पीक हे महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या परिसरात घेतले जात होते. मात्र परंपरागत शेती करणाऱ्या पोमणे कुटुंबातील अजित पोमणे यांनी नवीन तंत्राची कास धरून आपल्या जिद्दीच्या जोरावर स्ट्रॉबेरीचे पीक कोऱ्हाळे बुद्रुक येथे यशस्वीरीत्या घेऊन बारामती तालुक्यात स्ट्रॉबेरी शेती घेण्याचा पहिला मान मिळवला आहे.तसेच कोरोना काळात सर्व बाजार पेठा बंद असताना शेतातील मालाची विक्री बांधावर केली.अजित पोमणे हे नवनवीन शेती पिकांचे प्रयोग शेतात यशवीरित्या राबवित असतात.याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.