कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बारामती-दौंड रेल्वे सेवा पुन्हा काही अंशी सुरू!
लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे.
कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बारामती-दौंड रेल्वे सेवा पुन्हा काही अंशी सुरू!
लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे.
बारामती वार्तापत्र
करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून बंद रेल्वेसेवा पुन्हा अंशतः सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असून गुरुवारपासून दि. २७ पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फेऱ्या केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
वास्तविक बारामती-पुणे अशी रेल्वे सेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी होती, प्रत्यक्षात ही मागणी पूर्णच झालेली नसून सध्या तरी अंशतः रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल.
रेल्वेने ही सेवा सुरू केली असली तरी त्यातून गैरसोयच जास्त होण्याची चिन्हे आहेत. बारामती ते पुणे रेल्वे सुरू करा, अशी मागणी असताना प्रत्यक्षातफक्त पुण्याहून बारामतीला येण्याची सोय करण्यात आली आहे. बारामतीहून पुण्याला जाण्याची सोय उरलेली नाही.
प्रसिद्धीपत्रकानुसार, गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौड
रेल्वेस्थानकावर येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती मळद, शिसुफळ, कटफळ मार्गे बारामतीत सव्वा दहा वाजता दाखल होईल. हीच गाडी तीन तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी सव्वा एक वाजता दौंडकडे रवाना होईल. दौंडला ही गाडी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. रेल्वेने बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी व दुपारी या पूर्वी सुरू असणारी गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
आता अंशतः सेवा सुरू करताना पुण्याहून बारामतीला येण्याची सोय झाली, पण बारामतीहून पुण्याला जाणे शक्य ठेवलेले नाही.
रेल्वेने प्रवास करायचा असल्यास लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे.
बारामतीकरांची गैरसोय
रेल्वेने बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी
सकाळी व दुपारची गाडी पुन्हा पूर्ववत
सुरु करावी, अशी बारामतीकरांची मागणी
होती. प्रत्यक्षात पुण्याहून बारामतीला
येण्याची सोय झाली; पण बारामतीहून
पुण्याला जाण्याची सोयच नाही, अशी खंत
बारामतीकरांनी व्यक्त केली.रेल्वेने प्रवास करायचा असल्यास लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे.