कोविड लॅब चे काम कौतुकास्पद:राजेश टोपे.
बारामती मेडिकल कॉलेजला आरोग्य मंत्र्याची भेट.
कोविड लॅब चे काम कौतुकास्पद:राजेश टोपे.
बारामती मेडिकल कॉलेजला आरोग्य मंत्र्याची भेट.
बारामती:वार्तापत्र – राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथील शासकीय मेडिकल कॉलेजसह येथे सुरू असणाऱ्या कोविड लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी याच वर्षी सुुरू झालेल्या मेडिकल कॉलेजचे व येथे सुरू असलेल्या कोविड लॅबचे कामकाज अतिशय समाधानकारक सुरू असल्याचे सांगत कौतुक केले.
यावेळी शासकीय मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे उपस्थित होते.
टोपे म्हणाले की, मेडिकल कॉलेजची बांधणी अतिशय उत्तम झाली आहे. शासकीय मेडिकल कॉलेजचे हे पहिले वर्षे आहे. तरीही कोविड लॅबचे कामकाज अतिशय नियोजनबद्ध व समाधानकारक सुरू आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. बारामती येथील करोना रूग्णांच्या संबधित व नागरिकांना देण्यात येणार्या आरोग्य सेवेविषयी आढावा आरोग्य मंत्र्यांनी घेतला आहे.