कोविड १९ निदान चाचणी केंद्राचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न.
कोणाची चाचणी पॉझिटिव्ह येऊ नये: अजित पवार यांची अपेक्षा
कोविड १९ निदान चाचणी केंद्राचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न.
बारामती एमआयडीसी मधील वैदकीय महाविद्यालयात आज शनिवार ३० मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड १९ चाचणी केंद्राचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले .
या उदघाटन वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,नगरसेवक किरण गुजर , वैदकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ संजयकुमार कोविड विभाग प्रमुख ,डॉ विद्या अर्जुनवाड, सहयोगी प्राध्यापिका डॉ वैशाली डोहे, सहायक प्राधिपिका डॉ सुजाता कांबळे डॉ यशवन्त कुलकर्णी,डॉ मंगेश देशमुख, बांधकाम विभागाचे अभियंता मिलिंद बारभाई उपअभियंता प्रसाद पाटील , व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्तीत होते. सदर सुविधा मुळे कोरोना संशयित पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह याचा अहवाल लवकर प्राप्त होईल व निदान करणे लगेच शक्य होईल व पुणे येथील रुग्णालयाचा ताण कमी होणार आहे व राज्यात सहा ठिकाणी आशा प्रयोगशाळा उभा केल्या आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली .शाब्दिक स्वागत व चाचणी केंद्राची माहिती वैदकीय अधिष्ठाता डॉ संजयकुमार तांबे यांनी दिली.