कोविड-19 च्या काळात शहरांमध्ये अनेक विधी ऑनलाइन पद्धतीने पडले पार दिगंबर जोशी
पारंपारिक विधीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
कोविड-19 च्या काळात शहरांमध्ये अनेक विधी ऑनलाइन पद्धतीने पडले पार दिगंबर जोशी
पारंपारिक विधीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
बारामती वार्तापत्र
कोविड-19 च्या काळामध्ये बारामती येथील दिगंबर जोशी व उमेश चवरे या पुरोहितांनी बारामतीसह इतर ठिकाणचे शेकडो धार्मिक विधी संस्कार ऑनलाइन स्वरूपात पार पाडत पारंपारिक विधीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लोकांची गरज पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती बारामती वार्तापत्र ला बोलताना दिली.
मार्च अखेरपासून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. टाळेबंदीमुळे सारे घरामध्येच बंदिस्त झाले. व्यवहार काही काळ ठप्प झाले असले, तरी एका गोष्टीला मात्र काहीही उपाय नव्हता. या परिस्थितीत अनेक जणांना आपल्या जिवलगांचा वियोग सहन करावा लागला. सुरुवातीला काहीसे सावध पण नंतर अगदी बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात पुरोहितांनी संस्कारसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पुरोहितांनी बारामती,पुण्यातच येथेही ऑनलाइन पद्धतीने संस्कार केले.