कोव्हिड चे रिपोर्ट मिळणास का होते आहे दिरंगाई…?? वाचा सविस्तर.
मेडिकल काॅलेज अणी होस्टेल साठी करोडो रुपये खर्च करुन काय ऊपयोग ?
कोव्हिड चे रिपोर्ट मिळणास का होते आहे दिरंगाई…?? वाचा सविस्तर.
मेडिकल काॅलेज अणी होस्टेल साठी करोडो रुपये खर्च करुन काय ऊपयोग ?
बारामती वार्तापत्र
बारामती काही वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेल ची निर्मिती केली होती. या कोरोनाच्या काळात बारामतीतील कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत चालल्या मुळे त्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्या मेडिकल कॉलेला व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र काल बारामतीत मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे बारामतीतील वीजपुरवठा काही काळा करिता खंडित करण्यात आला होता. परंतु नंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला तरी देखील काल रात्री चार ते पाच तास मेडिकल कॉलेज येथील कोविड सेंटर अंधारात असल्यामुळे तेथील रुग्णांची मोठी गैरसोय झाली होती. त्याच बरोबर कोरोना संशयितांचे तपासणी साठी घेण्यात आलेले नुमने वीज पुरवठ्या अभावी तपासणी चे राहून गेल्यामुळे आजचे तपासणी अहवाल येण्यास उशीर झाला.त्यामुळे एवढे लाखो रुपये खर्च करून उभारले गेलेल्या कोविड सेंटर मध्ये जनरेटर ची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यामुळे आता तेथील एकूण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले.
नक्की कमतरता कशाची?
जनरेटरची की डिझेलची???